सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच केंद्राच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे आघाडी सरकार कोरोनाचा मुकाबला करत असताना याच मुद्द्यावरून आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याचे काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आज जर मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केले आहे फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही गायकवाड यांनी दिला होता. ते शनिवारी बुलडाण्यात बोलत होते.
सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. पण विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला आहे. केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.