मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज देशभरात कोरोना रुग्णवाढीचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात आता सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पुढारी, सेलिब्रीटी यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्या पाठोपाठ आता शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना सुद्धा दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
या संदर्भातील माहिती स्वतः खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून दिली आहे. आज पुन्हा माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत.माझी प्रकृती उत्तम असून सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी” असे ट्विट त्यांनी केले आहे.
याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले होते. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. श्रीकांत शिंदे यांना याआधी १ मार्च रोजी पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते.
आज पुन्हा माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत.माझी प्रकृती उत्तम असून सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) April 14, 2021