सांगली दि.१० – राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले आहे, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमध्ये प्रवेश केला तर तोंडाला काळे फासू असा इशारा ही शिवसेनेने दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरणामध्ये कोर्टाच्या निकाल नंतर मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले, असे बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हेच फडणवीस गृहमंत्री होते. तेव्हा सर्व जगाला छाती ठोकून सांगत होते.
महाराष्ट्र पोलीस जगात भारी आहेत आणि सत्ता गेल्यानंतर पोलीसाच्या विरोधात असे वक्तव्य करत आहेत, असे मत महेश कांबळे यांनी व्यक्त केले. याचसोबत फडणवीस यांचा निषेध करत सांगली जिल्ह्यात फिरकला तर तोंड काळे करू, असा इशारा ही यावेळी शिवसेनेने दिला.