कोल्हापूर – शककर्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात तात्काळ परत आणावी यासाठी कोल्हापूरातील शिवदुर्ग संवर्धन समिती आक्रमक झाली आहे. लंडनच्या बॅंकहिम पॅलिसमध्ये असलेली तलवार ही भारतात परत आणण्यात अनेक सरकार अपयशी ठरले आहेत.अश्यात ही तलवार भारतात परत आणावी या मागणीसाठी शिवदुर्ग संवर्धन समितीने पुढाकार घेतला आहे.
या समितीच्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडमधून परत आणली जात नाही. तोपर्यंत पन्हाळ्यावरील सज्जाकोठी इथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. सद्या या कार्यकर्त्यांनी सज्जाकोटी या ऐतिहासिक वास्तूत ठिय्या आंदोलन सुरू केलं असून काही केल्या आम्ही सज्जाकोटी वरून खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली आहे.