सोलापूर-सोलापूर शहरांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मा.आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर शहरातील भाजी मार्केट येथील फळ विक्रेते व भाजी विक्रेते या सर्वांची कोरोनाची तपासणी सक्ती करण्यात आले होती. त्याअनुषंगाने सोलापूर शहरातील सर्व भाजी मंडई येथील भाजी विक्रेते यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
याचधर्तीवर शहरातील सर्व भाजी मंडई येथे कोरोनाची चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये एकूण विक्रेता यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १११ जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच शहरातील सर्व दुकानदार व व्यापारी,कारखान्यात काम करणारे कर्मचारी तसेंच शहरातील रिक्षा चालक यांनी शासनाच्या आदेशानुसार १० एप्रिलपर्यत आपली कोरोनाची तपासणी करून घ्यावे. यासाठी शहरांमधील पाच प्रायव्हेट लॅब आहेत.
मेट्रो पॉलिसी लॅब, कृष्णा लॅब,अपोलो लॅब, इनोवेशन इंडिकेट लॅब, थायरो केअर लॅब त्यांच्याकडे या तपासणी केल्यास RTPCR तपासणी ५०० रुपये व घरी तपासणी केल्यास ८०० रुपये घेण्यात येत आहेत. असे ५ लॅब मधून rt-pcr तपासणी केली जात आहे.
तसेच सोलापूर शहरात रॅपिड अंटीजन टेस्ट तपासणीसाठी शहरातील ९५ हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली आहे हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यास १५० रुपये घेतले जातील तसेच घरी येऊन तपासणी केल्यास ३०० रुपये घेण्यात येत आहे हे दर शासनाने ठरवले आहे. तरी दुकानदार व व्यापारी यांनी लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी तसेच दुकानदार व व्यापारी यांनी अँटीबोडीज टेस्ट किंवा rt-pcr टेस्ट किंवा रॅपिड टेस्ट तसेच कोरोनाची लस घेतलं असेल अशांनी आपल्या दुकानात रिपोर्ट ठेवावे. तपासणी अहवाल न आढळल्यास त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.