नवी दिल्ली – कोरोनासारख्या भयंकर विषाणूने संपूर्ण जाग पोखरून काढले आहे. दिवसेंदिवस लाखोंच्या संख्येने देशात रुग्ण आढळत आहेत. अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील कर्त्या पुरुषला किंवा अनेक ठिकाणी कुटुंबातील सर्व व्यक्तींना कोरोनाची लागण ओवून जीव गमवावा लागत आहे. अशीच एक मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील सिकंदरा घडली आहे. एकाच घरात कोरोनाने तिघांचा जीव घेतला आहे. एका कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडला.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार ६० वर्षीय वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर त्याच्या आईची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. मुलापाठोपाठ आपल्या पतीचा देखील मृत्यू झाल्याचं समजताच महिलेला खूप मोठा धक्का बसला. तिने रुग्णालयातच आपला जीव सोडला. तसेच या कुटुंबातील एका दहा वर्षांची मुलगी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.