अमरावती – राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यात ग्रामीणभागातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र कोरोना झालेल्या रुग्णाला दवाख्यान्यात न घेऊन जाता एका ढोंगी साधू बाबाकडे घेऊन घेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हि घटना अमरावतीला जिह्यातील मेळघाटात घडली आहे. देशात कितीही विकास झाला तरीही अजून अनेक लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत.
काही दिवसांपूर्वी मेळघाटातील सेमाडोह आरोग्य केंद्रात एका ४५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार करायचे सोडून नातेवाईक महिलेला उपचारासाठी मंत्रिकाकडे घेऊन गेले. मांत्रिकानेही संबंधित कोरोनाबाधित महिलेवर उपचार केले. पण उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे