हैद्राबाद- प्रसिद्ध गायिकेच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार हैद्राबादमध्ये उघडकीस आला आहे. प्रकरणी पीडितेच्या सख्ख्या मावशीसह चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांसाठी प्रसिद्ध गायिका आपल्या मुलीला स्वतःच्या बहिणीकडे ठेऊन चेन्नईला सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. मात्र तिच्या मुलीने फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला व ताबडतोब गायिका चेन्नईहून परतली. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार मावशीने तिला चेन्नईतील किलपौक भागात असलेल्या चर्चमध्ये नेलं. तिथे हेन्री पॉल या पाद्रीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे.
या सर्व प्रकरणात सख्खी बहीण, तर बहिणीचा पती याशिवाय त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा आणि चर्चच्या पाद्रीविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.