मुंबई । प्रॅन्क व्हिडिओच्या नावाने अश्लील व्हिडिओ बनवून अपलोड करणाऱ्या एका टोळीला मुंबई साईट सायबर पोलिसांनी अटक केली असून त्यांनी आतापर्यंत 300 हून अधिक अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले आहेत.
लॉकडाऊन दरम्यान या टोळीने सोशल माध्यमावर असे व्हिडिओ अपलोड करून जवळपास दोन करोड रुपये कमावले होते. प्रकरणातला मास्टरमाइंड हा एक चांगला ट्युशन टीचर आहे. ज्याला दहावीमध्ये ९८ टक्के गुण मिळाले होते. अन्य दोन आरोपी हे त्याचेच विद्यार्थी आहेत. या घटनेमुळे दोन विद्यार्थिंनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होत्या तर एकीने आपला साखरपुडा मोडला आहे.या घटनेनंतर सायबर क्राईम ब्रँचने आतापर्यंत १७ चैनल्स आणि पाच फेसबुक अकाउंट बंद केले आहेत.
कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड करून पैसे कमावता येतात आणि त्या नादातच या आरोपीने सुरुवातीला प्रँन्क व्हिडिओ बनवले. त्यानंतर हळूहळू अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. म्हणूनच या आरोपीने तब्बल १७ चैनल सुरू केली. त्या चॅनेलला १५ करोड लोक फॉलो करत होते.
तर सिनेमामध्ये काम देण्याच्या आमिषाने या चॅनेलमध्ये मुलींना काम दिले जात होते.
या आरोपीने आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ बनवले आहेत. काही मुलींनी या व्हिडिओमध्ये आपत्ती दर्शवली परंतु त्यांना धमकी देण्यात आल्याचीही माहीती समोर आली आहे.