सोलापूर- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे मंदिर काल रात्री ८ वाजल्यापासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.
पुढील आदेश येईपर्यंत स्वामींचे मंदिर भक्तांसाठी बंदच असणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मंदिरातील सर्व धार्मिक विधी,पूजा,आरती नियमितपणे पार पडणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.