देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. तसेच आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी, राजकीय पुढारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोनाची लागण झल्याचे वृत्त समोर आले होते. तसेचच अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे, त्यातच आता मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या संदर्भातील माहिती स्वतः सीताराम येचुरी यांनी ट्विट करून दिली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे की, “कोरोनामुळे आज सकाळी माझा मोठा मुलगा आशिषचा मृत्यू झाला आहे. या कठीण काळात आम्हाला आशा दाखवणाऱ्या आणि आशिषची काळजी घेणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो.” असे ट्विट करून त्यांनी माहिती दिलेली आहे.
आशिष येचुरी 35 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुडगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी दिल्ली होती. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाने आशिष यांच्या मृत्यूवर वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटलंय, “सीताराम येचुरी आणि इंद्रायणी मजुमदार यांचा मुलगा आशिष यांच्या मृत्यूमुळे आम्हाला दु:ख झालंय. याप्रसंगी पक्ष येचुरी कुटुंबीयांसोबत आहे. तसेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुद्धा ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.