नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. तर दुसरीकडे युद्ध पातळीवर लसीकरणाला सुरवात झालेली आहे. त्यातच येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सुद्धा लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी बुधवार पासून सायंकाळी ४ वाजेपासून नोंदणीला सुरवात येणार होती. मात्र पहिल्याच दिवशी मोठ्या संख्याने नागरिकांनी लसीकरणसाठी नोंदणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर जवळपास १.३३ कोटींहून अधिक लोकांनी लस घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. राज्य आणि खासगी लसीकरण केंद्रांकडे उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्याच्या आणि स्लॉटच्या आधारावर नागरिकांना लसीकरणासाठी वेळ दिली जाणार आहे. लसीकरणाचा साठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानं महाराष्ट्र आणि राजस्थानात मात्र १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार नाही. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.
संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांसहीत करोना योद्ध्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आलं होतं. त्यानंतर ४५ वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं होतं. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना https://www.cowin.gov.in/home वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.