भारतीय संघाचा क्रिकेटर हरभजन सिंग अर्थातच आपला सगळ्यांचा लाडका भजीच्या घरी एका नवीन पाहुण्यांचे लवकरच आगमन होणार असल्याची माहिती अभिनेत्री व हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी सांगणारे फोटोज शेअर केले आहेत.
आज गीताने आपण गरोदर असल्याची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली व गीताने स्वतःचे बेबी बम्पसोबतचे फोटोज शेअर केले आहेत.
त्याचबरोबर आपल्या परिवारासोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत. यात गीता, तिची मुलगी हिनाया आणि तिचा पती हरभजन हे दिसत आहेत.हिनायाने आपल्या हातात “Soon to be big sister” असा मजकूर लिहिला आहे.“Coming soon….July 2021” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. गीता आणि हरभजन 29 ऑक्टोबर 2015ला लग्नबंधनात अडकले. तर 2016 साली त्यांची मुलगी हिनायाचा जन्म झाला.