• Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
Shivbandhan News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर
No Result
View All Result
Shivbandhan News
No Result
View All Result

बेटा..मी हे वचन पुर्णच करणार, तुझ्या मुलांना मी खुप मोठं करणार.. पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

” कुंकू उततं ताईला, लावू नका”

प्रतिनिधी:- मयुरी कदम by प्रतिनिधी:- मयुरी कदम
April 22, 2021
in इतर, ताज्या बातम्या
0
बेटा..मी हे वचन पुर्णच करणार, तुझ्या मुलांना मी खुप मोठं करणार.. पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला कोरोनामुळे गमावत आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनासमोर हात जोडले आहेत. कोरोनाचा हा काळ भयंकर असताना यावेळी येणारं दुसरं संकट माणसाला हतबल करत आहे. असाच भावनिक प्रकार माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत घडला आहे. पंकजा मुंडेना गेल्या १४ वर्षांपासून सुरक्षा देणारे त्यांचे सुरक्षा रक्षक गोविंदा यांचं निधन झालं आहे. त्यांना हे दुःख सहन होण्यापलीकडचे आहे. मात्र कोरोनाच्या या परिस्थितीत त्यांचं निधन झालं आहे. पंकजा मुंडे यांनी भावूक पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

“गोविंद, अरे गोविंदा “अशी हाक
मी २००९ पासून किती वेळा मारली असेल..माझ्या तोंडात तीळ भिजत नव्हता अगदी..
आज पहाटे त्याच्या मोबाइलवरून फोन आला. मला वाटलं चमत्कारच झाला आणि गोविंदा शुद्धीवरआला…पण नाही, असे चमत्कार होत नाहीत..३ जूनला कळलं आहेच..
“वाघ हो माझा” त्याची पत्नी तिकडून आक्रोश करत होती. मी ही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप मोठा हुंदका आला, माझं मलाच आश्चर्य वाटलं…इतकी खंबीर मी..कशी कोसळले!

पण काही नाते आपल्या आयुष्यात एक जागा भरतात आणि ती पूर्णपणे रिक्तही करतात…जी कधीच भरू शकत नाहीत.

मोठ मोठया डोळ्यांचा, चुणचुणीत, पहिलवान टाईप हा गोविंद..2009-10 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या आयुष्यात आला. माझ्या गाडीवर हल्ला झाला होता, निवडणूक हिंसक वळण घेत होती. ५-६ जण सतीश, गोविंद, अंगद, गंगा, प्रल्हाद, सुरेश हे माझ्याकडे आले. बाकी जण कमी बोलायचे पण गोविंद, म्हणाला, “आम्हाला तुमचं अंगरक्षक व्हायचयं.” तुमचे ‘भाऊ’ म्हणून तुमच्यामागे रहायचं आहे. आम्हाला जिथे जाल तिथे जेवण द्या बस.. बाकी काही नको. मुंडे साहेबांचा वारस तुम्ही आम्हाला जपायचं आहे. खरंच!! जपलं हो या पोरांनी… एक घरी बसला. एक व्यवसायात गेला. पण गोविंद, गंगा, प्रल्हाद, सुरेश आजपर्यंत राहिले. प्रीतमताई राजकारणात आल्यावर नवख्या असल्याने मी त्यांना हे trained लोकं दिले. पण, एके दिवशी गोविंद ला म्हणाले ‘तू माझ्याबरोबर परत ये बाबा गर्दी आवरताना प्रॉब्लेम होतो’…

हे सर्व चप्पल, शर्ट, पॅन्ट घालत होती. ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ सुरू होणार होती. त्याआधी कांही दौऱ्यात पोरांचे पाय इतके तुडवले गेले की सुजून गेले. मग, पोलिसांसारखे बूट घेतले. संघर्ष यात्रेच्या गर्दीत एक सारखे दिसावे व ओळखू यावे म्हणून सारखे सफारी शिवले. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचं ‘कडं’ मला सुरक्षित करायचं. त्या कड्यातील एक गडी निखळला. माझ्या केसालाही धक्का न लावण्यासाठी माझ्या या भावांनी इतके कष्ट घेतले की बस्स! मी कुठे कार्यकर्त्याकडे गेले की, बदाम-काजू दिले की मुठीत घ्यायचे आणि यांच्या हातात द्यायचे, कारण त्यांची वरात माझ्याबरोबर उपाशी- तापाशी.. कोणी साखर घातली कोणी पेढा दिला, प्रसाद दिला न मागताच हात वळवला आणि टाकला तो झेललाच यांनी गोड मी जास्त खाऊ नये म्हणून…

” कुंकू उततं ताईला, लावू नका”

हे वाक्य एकदा सांगितलं गोविंदला की बरोबर दहा सेकंदात तो पुढे जाणार आणि ते दिवसातून हजार वेळा घोकणार..त्यानंतर माझ्या कपाळावर कुंकू उतले नाही. खिशात पाण्याची बाटली, स्वच्छ नॅपकीन, अशात सॅनिटायझर न चुकता होतचं त्याच्या हातात..स्वच्छता ताईला आवडते म्हणून माझ्या गाडीत मातीचा, धुळीचा कण ही कधी येऊ दिला नाही. बाहेर चिखलात चालताना माझा पाय दगडावरच पडावा असे दगड रांगेत टाकूनच ठेवणार..

चपलेचा व्हिडिओ आणि बातमी सर्वांनी केली पण चप्पल गाळात फसली होती. दोन तीन सुरुवातीच्या काळातील कार्यक्रमात चप्पल सापडली नाही म्हणून मी काढल्यावर बाजूला ठेवायचे. मध्यतंरी मणक्याचा त्रास होता म्हणून अगदी पायापर्यंत घालून द्यायचे. मी ओरडायचे.. पण, ताई असू द्या हो..तुम्ही साहेब आमचे बॉस आशिर्वाद मिळतो मग मी ही पाया पडल्या सारखे करायचे आपल्या वारकरी संस्कृतीत करतात तसं..मला तो बॉस म्हणायचा हे मला नंतर कळायचं. पण तो खरा बाॉस होता. सर्वाची ओळख, सर्व प्रोटोकॉल आणि निर्भीड..

“बघ रे त्याला जरा”. म्हणलं तर एखाद्या गुंडाला ठेचायला तयार..धाडस कमालीचं ! काही स्वार्थ नाही, काही मागितलं नाही. मी तर त्याला गंमतीने ‘दबंगचा सलमान’ म्हणायचे. मुलीला – मुलाला शिकवायचे फक्त आणि Boss चा शब्द पाळायचा..माझा बाण होता तो..सोडला की लागलाच म्हणून समजा..!

फटाक्यांचा अंगार माझ्या वर नको म्हणून तुझ्या पाठीवर झेललास तू गोविंदा ! चालत्या गाडीत बसलास आणि पळत्या गाडीतून उडी मारलास बाळा !
एवढे दगडं पडत होते, साहेबांच्या अंत्यविधीत..मी बेशुद्ध सारखी वावरत होते, पण तू मला दगड लागू नये म्हणून दगड झेलत होतास. कितीही गर्दीत मला चेंगरायची भिती नाही वाटली, पण तू तुडवून घेत होतास. किती माया केलीस रे..जन्मदात्या आईसारखी का पोटच्या लेकरासारखी !

माझ्या या संघर्षमय जीवनात मी काहीही नसेन तरी, माझ्या मागे पाठीराखा सारखा तू असशील आणि मला Boss म्हणशील असं गृहीतचं धरलं होतं मी..पण शेवटची भेट झाली तेव्हा मुलीला घेऊन आलास “हसमुख, चुणचुणीत ती ही ! मी म्हणाले हिला IPS करू, मुलाला #IAS ..तर म्हणालास, तेवढं करा ताई बस ! किती निरपेक्ष, समर्पित सेवा केलीस बेटा..मी हे वचन पुर्णच करणार, तुझ्या मुलांना मी खुप मोठं करणार..

तू मला कधीही भिती वाटू दिली नाही.

एकटं वाटू दिलं नाही,मी ही तुझ्या कुटुंबाला एकटं वाटू देणार नाही. काही नाती रक्ताची नसतात पण ह्रदयाची असतात. लेकराला सांभाळावं, तसं तुम्ही सर्वांनी सांभाळलं आणि आईला मान द्यावा तसा दिलात आणि म्हणालात Boss तुम्ही माझ्यासाठी अमुल्य आहात. गोविंद..तू पुन्हा होणे नाही. तुझी जागा रिकामीच राहील..१४ वर्ष तू भरून काढलेली जागा..माझे भावं अचूक हेरत होतास तू ..सर्व शब्द झेलत होतास..हा शब्द का ओलांडलास..तू बेटा जगायचं होतंस अजून..! पण त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत रहाशील बाळा..
#covid_19

Tags: bjpemotional postLatest Newsmarathi newsPankaja Mundeshivbandhanshivbandhan newsताज्या बातम्यापंकजा मुंडेशिवबंधनशिवबंधन बातम्या
Previous Post

नाशिक दुर्घटना हलगर्जीपणामुळे, अज्ञातव्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Next Post

पावसाळीपूर्व स्थितीचा आढावा घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कार्यपूर्ततेसाठी दिली १५मे डेडलाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

पुणतांबा येथे वंदनीय दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे भक्तीमय वातावरणात पुजन

January 25, 2023
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुणतांबा येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

January 21, 2023
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून देण्याचा पराक्रम.

January 10, 2023
राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

राजापूर-लांजातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना उपनेते आमदार डॉ राजन साळवी यांचे अध्यक्षतेखाली सत्कार

January 6, 2023
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे, याचं संपुर्ण क्रेडिट सावित्रीमाईंचं आहे, वाचा महत्त्वपूर्ण माहिती..

January 3, 2023
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवारांचा संभाजीराजांनी घेतला संतप्त शब्दात समाचार,म्हणाले…

January 2, 2023
अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरुन कडेलोट; छत्रपती संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चा आक्रमक

January 2, 2023
दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

दोन दिवसाच्या मुलाला निर्दयी बापाने फरशीवर आपटलं! बाळ गंभीर जखमी

January 2, 2023
लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

लग्नाळूंसाठी २०२३ वर्ष ठरणार सुगीचं! तब्बल ८ महिने वाजणार सनई चौघडे

January 2, 2023
२०१६ च्या नोटबंदीवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नोटबंदीचा निर्णय हा…

२०१६ च्या नोटबंदीवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नोटबंदीचा निर्णय हा…

January 2, 2023
  • Home

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • इतर

© 2021 Website Managed by Bluesquareinfotech.in 9136039884 I 9987368026

या वेबसाईटचा सर्व मालकी हक्क संपादक पोपटराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण या वेबसाईटवरील कोणता ही कंटेंट कॉपी करू शकत नाही. बातमी आवडल्यास बातमी शेअर करा.
WhatsApp Group