राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज मोठया प्रमाणात रुगांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशातच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोना विरोधातील लढाईत ठाकरे सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आह. या संदर्भातील माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर वाद होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवले होते. ते या पत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर संदर्भात महाराष्ट्रातील वस्तुस्थितीची जाणीव करून दिली होती. यानंतर आज सोनिया गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने पूर्ण क्षमतेने लढाई देत आहे. शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे. राज्य सरकारच्या कामाबाबत सोनिया गांधी यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच,राज्यातील सध्याची आरोग्य यंत्रणेची परिस्थिती उपलब्ध ऑक्सिजन साठा पूर्ण संख्या इंजेक्शनची उपलब्धता या विषयांवर चर्चा झाली असून राज्यातील काही अडचणीचे विषय देखील सोनिया गांधी यांच्याशी चर्चा बाळासाहेब थोरात यांनी केल्याचे समजत आहे.
तसेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात गरिबांना मोफत लसीकरण झाले पाहिजे, अशी भूमिकाही सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा थोरात यांच्याकडे व्यक्त केली आहे. याआधीही सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सूचना केल्या आहेत .