मुंबई : प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विवेक यांचे आज सकाळी पहाटे निधन झाले आहे. विवेक यांना कार्डिअॅक अरेस्टचा अटॅक येऊन त्यांची प्राणजोत मालवली. त्यांना अटॅक आल्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
विवेक हे तमिळ सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांना अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. विवेक यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. त्यांना लहानपणापासून शाळेत असल्यापासून अभिनयाची आवड होती.
त्यांनी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली. शिवाय उदरनिर्वाह करण्यासाठी ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करु लागले. याच दरम्यान 1987 साली मन्नाथी उर्थी वेंडम या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या चित्रपटातून विवेक यांच्या अभिनयाचं कौतुक सर्वांनीच केले होते. रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामुळं त्यांना बॉलिवूड चाहते देखील फॉलो करु लागले होते.