रविवारी मिसेस श्रीलंका ‘ब्यूटी क्वीन’ चा ‘किताब पुष्पिका डी- सिल्वा हिने जिंकला. मात्र याच दरम्यान पुरस्कारावरून जोरदार भांडण झाल्याचे समोर येत आहे. व विजेती पुष्पिका डी- सिल्वा हिला डोक्याला मार लागल्याचे समोर येत आहे.
पुष्पिका डी- सिल्वा हिने पुरस्कार जिंकल्यानंतर स्टेजवरच बाचाबाची झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोहळ्याच्या काही क्षणानंतर २०१९ ला हा पुरस्कार जिंकणाऱ्या कॅरोलिन जुनेरी हिने पुष्पिकाचा घटस्फोट झाल्याने तिला हा पुरस्कार दिला शकत नाही असं बोलून तिच्या डोक्यावरचा मुकुट हिसकावून घेतला .
मात्र सौंदर्य स्पर्धच्या आयोजकांनी पुष्पिका घटस्फोटीत नसल्याचे खात्री करून तिला तिचा परत देण्यात आला.