गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सर्वच सणांवरती कोरोनाच सावट असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी करोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सध्या राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून वीकेण्ड लॉकडाउनही लावला आहे. गुडीपाढवा १३ एप्रिल म्हणजेकच उद्या असल्याने राज्यसरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारची मिरवणूक अथवा मोटार सायकल रॅली काढण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच यावर्षीचा गुढीपाडवा सण साध्या पद्धतीने घरात राहूनच साजरा करावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
नियमावलीनुसार, सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणं अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही नव्या नियमावलीत नमूद करण्यात आलं असून गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरात राहून कुटुंबाबरोबरच हा सण साजरा करावा असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे.