फलटण – गिरवी ता फलटण जि सातारा केंद्रातील जिल्हा परिषद शाळा माळेवस्ती शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती कुमठेकर यांची महाराष्ट्र शासन राज्य मराठी विकास संस्था व मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाढे पांठातर,पावकी,सव्वायकी,दिडकी,
अडीजकी,औटकी,एकोत्रे या पाठांतर स्पर्धेत खुल्या गटातुन राज्य स्तरावर निवड झाली आहे.
तृप्ती कुमठेकर या विविध शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प राबवण्याबाबत पुढाकार घेऊन शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी कामकाज करीत आहेत.
गणित विषयासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.प्राथमिक शिक्षकांच्या मधुन पाढे पांठातर स्पर्धेत राज्य स्तरावर निवड झालेल्या एकमेव शिक्षिका आहेत.प्राचिन काळातील पावकी सव्वायकी दिडकी यांचे पाठांतर करून स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल मा ना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमती शारदादेवी कदम, सह्याद्रीभैय्या कदम, सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, शिक्षणाधिकारी सौ.प्रभावती कोळेकर धनंजय चोपडे गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ शिक्षण विस्तार अधिकारी चेन्नया मठपती गिरवी केंद्र प्रमुख अनिल कदम गिरवी गावचे सरपंच शरद मदने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.
तृप्ती कुमठेकर यांनी गणित विषयासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी कामकाज करत असताना राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या जिल्हा परिषद शाळा मधील एकमेव शिक्षिका आहेत याचे सर्वत्र कौतुक होत आहे.