मुंबई। मुंबईतील ६०वर्षे जुन्या वडापावची अजूनही चर्चा, पाहा ह्या वडापावचा खास व्हिडीओ
मुंबई ही सर्वांचं स्वप्नंनगरी आणि याच स्वप्नंनगरीचा फेमस आणि उत्कृष्ट पदार्थ म्हणजे वडापाव. खरंतर सध्या सर्वच गोष्टी एवढ्या जलद गतीने बदलत चालल्या आहेत मात्र मुंबईचा वडापाव मात्र कोणी विसरत नाही.
अशाच एक मुंबईतील फोर्टच्या बोरा बाझार येथील ६४ वर्षे जुन्या रघू डोसावाला या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर हा फ्लाइंड वडा पाहायला मिळतो. खरंतर त्याच नाव ‘फ्लाइंग वडापाव’ हे वडापाव बनवण्याच्या विक्रेत्याच्या अनोख्या शैलीमुळे याला नेटिझन्सने असे नाव दिले आहे. ह्या वडापाव बनवणाऱ्याची खासियत म्हणजे एका हाताने वडा हवेत उडवतो आणि दुसऱया हाताने त्याचा अचूक झेल घेतो. अवघ्या काही क्षणांमध्ये होणारा हा प्रकार खवय्यांना थक्क करणारा आहे.
आमची मुंबई नावाच्या फूड ब्लॉगरने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो झपाटय़ाने व्हायरल झाला आहे.
त्यानंतर तो वडा मसाला पावासोबत कोबी, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, बीट आणि चीजसोबत ग्राहकांना सर्व्ह केला जातो. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.