राज्य शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊनचे नियम मोडून वॉकला जाणं सोलापूरकरांना चांगलं महागात पडलं आहे.जिल्ह्यात वाढत्या कोविड संक्रमणामुळे रुग्णसंख्या वाढत जात असून रुग्णालयात वैद्यकीय सेवांचा तुटवडा निर्माण होत आहे.
सोलापूर जिल्हा कोविड हॉटस्पॉट होत असूनही नागरिक सर्रासपणे नियम मोडून रस्त्यावर वॉकला जात असताना सकाळी १५ ते २० नागरिकांवर जेल रोड परिसरातील पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक धनंजय शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज नसताना बाहेर पडणं टाळा, वेगाने होणाऱ्या संक्रमानामुळे घरीच सुरक्षित राहा असे वेळोवेळी सांगूनही नागरिक दुर्लक्ष करत आहेत.शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करता खुलेआम बाहेर फिरणाऱ्या बेजवाबदार नागरिकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
प्रत्येक व्यक्तीकडून ५०० रुपये दंड आकारण्यात आला. कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.