कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राजधानी दिल्लीत कडकडीत लॅाकडाउनची घोषणा करण्यात आलीय. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लॅाकडाउनला कोणताही पर्याय नसल्याचे सांगितले आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने लॅाकडाउन करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. त्यामुळे सोमवारी रात्री १० पासून लॉकडाउनच्या सुरुवात होणार आहे. मात्र कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका असा आवाहन केलं आहे.
It has been decided to impose a lockdown in Delhi, from 10 pm tonight to 6 am next Monday (26th April): Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/hBB2qXpxpM
— ANI (@ANI) April 19, 2021
तसेच त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा देत आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटं बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली असही म्हणाले. दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. दिवसाला २५ हजार रुग्ण मिळत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल. दिल्लीत १०० पेक्षी कमी आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. एका खासगी रुग्णालयाने तर रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असं सांगितलं. मात्र वेळीच उपलब्ध झाल्याने खूप मोठी दुर्घटना टळली. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे असं केजरीवीलांनी म्हटलं.
In the next 6 days, we will make arrangements for more beds in Delhi. We thank Central govt for helping us. The lockdown period will be used to arrange oxygen, medicine. I request everyone to follow the guidelines: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/NAdiHHH9bN
— ANI (@ANI) April 19, 2021
“दिल्लीमध्ये आणखी रुग्णांना दाखल करून घेणं शक्य नाही आणि लॉकडाउनला पर्याय नाही. त्यामुळे आजरात्रीपासून दिल्ली पूर्णपणे बंद राहील, मात्र अत्यावश्यक सेवा व अजून काय सुरू राहणार व काय बंद राहणार याची नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.