पुणे – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कडक निर्बंध करण्यात आले असून संचारबंदी करण्यात अली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असल्याचे नियम जारी करण्यात आले. मात्र पुण्यात काही व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवत दुकानं सुरु ठेवली होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला असून संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट
During the weekend lockdown in Pune, all shops including those selling essential commodities except medicines are also closed. Strict action will be taken against those found violating curfew restrictions: Dr Ravindra Shisve, Joint Commissioner, Pune City Police pic.twitter.com/6pqJbIlKXR
— ANI (@ANI) April 17, 2021
त्यामुळे अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक मेडिकल दुकाने सुरु असतील. आता संपूर्ण पुण्यात कडकडीत लॉकडाऊन असणार आहे, विनाकारण फिरल्यास किंवा नियम मोडल्यास आता पुणेकरांवर कारवाई करण्यात येणार आहे.