कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असुन कोविड बाधित आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर आता परिस्थिती अजून हाताबाहेर जाऊ नये यासाठी १४एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक वाहतुकीवर कठोर निर्बंध राहणार आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार कामगार व मजुरांना मदत म्हणून काही सवलती देण्यात येतील.
मागच्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक सामान्यांचे आणि कामगार व मजुरांचे हाल झाले होते.याचीच पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेऊन १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्यात येईल.
तसेच कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासनासमोर मोठे आव्हान असून लॉकडाऊन मध्ये आरोग्य यंत्रणेस रुग्णांच्या उपचारांवर अधिक लक्ष्य देता येईल.तसेच जनतेने लॉकडाऊन बाबत मानसिक तयारी करावी असे आरोग्य मंत्री आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
तसेच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंल्टिलेटर ,लसीकरण आणि जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारण्यासाठी आरोग्य यंत्रणा चोवीस तास तत्पर असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे