मुंबई दि. १६ – कोरोनाच्या प्रादुर्भाव राज्यात पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानुसार पुन्हा एकदा काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्याचे आर्थिक चक्र सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ज्याचे पालन केले जाणे अपेक्षित आहे. राज्यात ही नवी नियमावली 31 मार्चपर्यंत लागू करण्यात आली आहे. ज्याचे पालन केले जाणे बंधनकारक आहे.
सर्व कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची सिनेमागृहे, हॉटेल हे ५० टक्के प्रवेश क्षमतेवरच सुरू राहतील. मॉल्सचालकांनाही लोकांना प्रवेश देताना सिनेमागृह, हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-धार्मिक कार्यक्रम-सभांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विवाह समारंभाला के वळ ५० जणच उपस्थित राहू शकतील. अंत्यसंस्कारालाही केवळ २० जणांनाच परवानगी देण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थेने याची अंमलबजावणी होईल याची खबरदारी घ्यायची आहे.