‘गर्जा महाराष्ट्र’ युट्यूब चॅनेलचा १,००,००० सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण!
निर्भीडपणे महाराष्ट्राचा आवाज मांडणारं ठरलं माध्यम

वैचारिक, सांस्कृतिक व कष्टकऱ्या महाराष्ट्राचा वेध घेणा-या महाराष्ट्रातील नावाजलेला ‘गर्जा महाराष्ट्र’ या युट्यूब चॅनेलने १ लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. अवघ्या काही कालावधीतच महाराष्ट्रातील विविध समस्यांवर तटस्थपणे भाष्य करून प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीचा धगधगता आवाज होण्याचं काम ‘गर्जा महाराष्ट्र’ या युट्यूब चॅनेल करत आहे.
बदलत्या काळानुसार राजकीय घडामोडी देखील झपाट्याने घडत आहेत. परंतु या राजकीय घडामोडींमध्ये अनेकदा भरडला जातो, तो सर्वसामान्य माणूस. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडणारी काही माध्यमे ही देखील सरकार धार्जीणी झाली आहेत. त्यामुळे कष्टकरी, शेतकरी यांचे प्रश्न तितक्या ज्वलंतपणे मांडले जात नाहीत. महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, शेती पिकाला भाव नाही, रखडलेली विकासकामे अशा अनेक मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वतः मात्र सत्तेत मशगुल राहण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतात. परंतु या सर्वांच्या विरोधात ठामपणे, निर्भीडपणे व निःपक्षपणे भूमिका मांडण्याचं काम ‘गर्जा महाराष्ट्र’ हे युट्यूब चॅनेल करत आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील विविध प्रश्नांवर भाष्य करण्याचं काम गर्जा महाराष्ट्रच्या माध्यमातून करण्यात येते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या पत्रकारितेला समाजमाध्यमांची जोड देऊन प्रत्येक भारतीयाचा आवाज होणा-या गर्जा महाराष्ट्रला अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच ‘गर्जा महाराष्ट्र’ युट्यूब चॅनेलने १,००,००० सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. परंतु ही केवळ सुरुवात आहे, आणि सबस्क्रायबर्स मिळवणं हा उद्देश नसून प्रत्येक अन्यायग्रस्ताला न्याय मिळावा हीच भूमिका पारदर्शकपणे मांडण्याचा प्रयत्न ‘गर्जा महाराष्ट्र’ अविरतपणे करत आहे.
गर्जा महाराष्ट्रचा डंका
‘गर्जा महाराष्ट्र’ हे माध्यम केवळ युट्यूबवरच नसून इन्स्टाग्राम, फेसबुक, व्टिटरवर देखील सक्रीय आहे. या समाजमाध्यमांवरही गर्जा महाराष्ट्रला तुफान प्रतिसाद मिळत असून नागरिकांचे पसंतीस उतरणारे ‘गर्जा महाराष्ट्र’ हे एकमेव मराठी माध्यम म्हणून नावारूपास येऊ लागले आहे.
गर्जा महाराष्ट्रसोबत जोडले जाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/@GaarjaMaharashtra