टीम इंडियाचा क्रिकेटपटू व दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर याच्या खांद्याची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग कताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. फोर अडवताना तो खांद्यावर पडला होता. दुखापत गंभीर असल्यामुळे अय्यर सीरिजमधून बाहेर झाला होता. त्याने हॉस्पिटलमधील स्वतःचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. व चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी आभारदेखील मानले आहे.
Surgery was a success and with lion-hearted determination, I’ll be back in no time ???? Thank you for your wishes ???? pic.twitter.com/F9oJQcSLqH
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) April 8, 2021
फोटो शेअर करून ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सिंहाच्या काळजाचा निश्चय करून मी लवकरच पुनरागमन करेन, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद,’ असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.