मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शनिवारी छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली. व त्यांना आज हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले . शनिवारी राज ठाकरे यांच्या कंबरेजवळच्या स्नायूवर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. कंबरेजवळच्या स्नायूत वेदना होत असल्याने त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी केली होती.
त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शनिवारी लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्याच संदर्भात शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत सत्ताधारी व विरोधी पक्षनेते उपस्थित होते तसेच हि बैठक सर्वपक्षीय होती. त्यामुळे या बैठकीचे निमंत्रण राज ठाकरे यांनाही देण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलमध्ये असल्याने राज ठाकरे बैठकीला उपस्थित नव्हते. परंतु मुख्यमंत्र्यानी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशी भूमिका मांडली आहे त्यामुळे राज ठाकरे आज संध्याकाळी याच संदर्भात आपली प्रतिक्रिया देणार असल्याची शक्यता आहे.