ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड पोलीस स्थानकात पोचले होते. तसेच पोलिसांच्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण केला होता. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांवर जोरदार टीका केली आहे.
त्यात आता पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा’ अशी मागणी नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. वास्तविक रेमडेसीवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित करून महामारीच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून दबाव टाकणा-या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
केंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का?
पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा.#BJPHoardingRemdesivir pic.twitter.com/hdsvYmdZAh
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 18, 2021