राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारदुपारी २ वाजल्यापासून राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आज ८ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून अजित पवार यांनी राज्यातील महिलांना मोठं बक्षीस दिलं आहे.
राज्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कोणतेही कुटुंब घर विकत घेईल तेव्हा घरातील महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) मोठी सूट दिली जाणार आहे. या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असून याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
प्रत्येक कुटुंबातील स्त्री ही घरांसाठी मेहनत घेत असते कष्ट करत असते व त्या गृहिणीची ओळख हि खऱ्या अर्थानं तेव्हाच ओळखली जाईल जेव्हा तिच्या नावावर ते घर असेल. त्यामुळे अजित पवारांनी मोठी घोषणा करत योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तर मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येईल आणि याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.