लातूर- मार्च संपला की बाजारात आंबे येण्यास सुरुवात होते मग पूर्ण एप्रिल- मे तर पूर्ण आंब्याचे सीझनचं असतात. मात्र बाहेरून आंबे कितीही चांगले दिसत असले तरी आतमध्ये अनेकवेळा आंब्यांना कीड लागलेली आढळते तर बऱ्याच वेळा आंबे काळे पडलेले असतात. देवगड, सिंधुदुर्ग अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या कीड, व रोगापासून आंब्याचे रक्षण करायचे असेल तर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हयांमध्ये चाकुर , औसा , उदगीर, व लातुर या तालुक्यामध्ये कृषि विभागामार्फत आंबा पिकावरील किड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्य आधारे पिक संरक्षक उपयायोजना प्राप्त होतात .
आंबा पालवीवरील तुडतुडयांचा प्रादर्भाव आढळुन आल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आंबा पालवीवरील फुलकिडयांनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रति १०लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेडॅझीम १२% + मॅन्कोझेब ६३% १० ग्रॅम प्रती १० लि. पाण्यातून फवारणी करावी असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.