अभाविप च्या गुंडांवर कायदेशीर कारवाई करत ; तात्काळ अटक करा
एसएफआयची मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे मागणी

वडवणी 🙁 प्रतिनिधी)दि. १ नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ची सभासद नोंदनी अत्यंत शांततेत सुरू असताना यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या गुंडांनी अचानक येऊन एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला केला. या घटनेचा एसएफआय तीव्र निषेध करते.
या हल्ल्यात एसएफआयचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे, गणेश जानकर या कार्यकर्त्यांना मार लागला आहे. इतरही कार्यकर्त्यांना सुद्धा मुका मार लागला आहे. गुंड प्रवृत्तीची अभाविप कायम असे हिंसक कृत्य करत आली आहे. त्यांनी त्यांच्या गुंड संस्कृतीची पुनरावृत्ती केली आहे. काहीही कारण नसताना, शांततेत एसएफआयचा सभासद नोंदणी कार्यक्रम सुरु असताना हा हल्ला केला गेला.
या प्रकरणी अभाविप च्या गुंडावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अटक करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, राज्य सहसचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष लहू खारगे, डीवायएफआयचे किरण ढोले, एसएफआयचे तालुका अध्यक्ष ज्योतिराम कलेढोन, तालुका कमिटी सदस्य अभिषेक हातागळे, नारायण सुरवसे यांनी वडवणी तहसील कार्यालयाचे तहसिलदार यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.