दरवर्षी आयपीएलचा हंगाम आला की सर्वच चाहते सर्व काम व टेन्शन विसरून आयपीएल बघायला बसतात. त्यात गोलंदाजांची बॉलिंग रंगली की आयपीएल बघायची मज्जाच वेगळी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात हेल्मेटचे दोन तुकडे झाल्याने गोंधळ पाहायला मिळतोय. मात्र हा व्हिडीओ भारतातला नसून झिम्बाब्वेतील हरारे या ठिकाणचा आहे.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान (Zimbabwe vs Pakistan) यांच्या दरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा २० वर्षीय गोलंदाज अर्षद इक्बालने टाकलेल्या बाउन्सरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धडकी भरवणाऱ्या बाऊन्सरमुळे झिम्बाब्वेचा फलंदाज तिनाशे कमुनुकम्वेच्या हेल्मेटचे अक्षरश: दोन तुकडे झाले.
Those dreadlocks surely saved Kamunhukamwe from potential concussion after getting hit by an Arshad Iqbal bouncer ???? #ZIMvPAK @ZimCricketv #VisitZimbabwe pic.twitter.com/3n6oxjVn8K
— Kudakwashe (@kudaville) April 23, 2021
हेल्मेटचे दोन तुकडे झालेले पाहून झिम्बाब्वे संघाचे वैद्यकीय कर्मचारी ताबडतोब मैदानात धावत आले आणि त्यांनी चेंडू लागलेल्या ठिकाणी पाहणी केली, मात्र कमुनुकम्वेला सुदैवाने दुखापत झाली नसल्याने तो थोडक्यात बचावला. पण, या घटनेने अजिबात विचलित न होता कमुनुकम्वेने आपला खेळ सुरू ठेवत संघासाठी सर्वाधिक ३४ धावा काढल्या, त्यामध्ये ४ चौकारांचा समावेश आहे. मात्र, फलंदाजांना हेल्मेटविना खेळणे किती महागात पडू शकते याचे हे चांगलेच उदाहरण आहे.