कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा फटका विविध क्षेत्रात तसेच दळण-वळण व वाहतूक सेवेला मोठ्या प्रमाणात बसला असून आता भारतीय रेल्वेकडून मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान सुरू असलेली तेजस एक्सप्रेस ची सेवा तूर्तास काही एक महिन्याकरिता बंद ठेवण्यात आली आहे.वाढते कोविड रुग्ण पाहता परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान तेजस एक्सप्रेस चे तिकीट बुकिंग बंद करण्यात आले असून आगाऊ तिकीट बुकींग केलेल्या प्रवाश्यांचे पैसे परत देणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.