सध्या देशभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांना कोरोनाला आपल्या पासून दूर ठेवण्याचा तसेच नियमांचे कडक पालन करण्याचा सल्ला देताना दिसत आहे. असाच सल्ला अभिनेत्री करीना कपूर-खान हिने आपल्या चाहत्यांना दिला होता. काहींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी थेट आपल्या सेलिब्रिटी मित्रांना हा सल्ला दे ! अशा शब्दात सुनावले आहे.
देशात ठिकठिकाणी सध्या कोरोनाने हौदोस माजवायला सुरवात केली आहे. अशात मास्क लावा, सतत हात धुवा, सॅनिटायझर वापरा, असे आवाहन सरकार व सेलिब्रिटींकडून करण्यात येत आहे. आता करिना कपूरनेही मास्क लावण्याचे आवाहन चाहत्यांना केले होते. इतकेच नाही तर योग्य पद्धतीने मास्क न लावणा-यांना तिने खडेबोल सुनावले होते. मात्र लोकांना असे फैलावर घेणे, तिच्यावरच उलटले. लोकांनी यानंतर करिनाला नको ते सुनावले.
सामान्य लोकांना सांगणे सोपे आहे. जरा तुझ्या सेलिब्रिटी मित्रांनाही सांग, जे इतक्या कठीण काळात मालदीवमध्ये सुट्टीला गेलेत, असे एका युजरने करिनाला सुनावले़. तर हाच सल्ला एक नेटकाऱ्याने करीनाला दिला आहे. तुझा चुलत भाऊ आठवड्यापूर्वीच गर्लफ्रेन्डसोबत मालदीवमध्ये फिरून आला, प्लीज त्याला सांगतेस का? असे या युजरने लिहिले आहे. तर इन्स्टाग्रामवर उतारे लिहिण्यापेक्षा जरा देशवासियांना मदत कर, असा सल्ला एका नेटकाऱ्याने तिला दिला आहे.