बीड- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस दिवसेंदिवस हजारोच्या पट्टीने रूग्ण मिळत आहेत. त्यामुळे अनेक गोष्टींचा तुडवडा निर्माण होत आहे. कोणाला बेड मिळत नाहीय तर कोणाला औषधांचा तुडवडा निर्माण होतोय. अशातच बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे अंत्यसंस्कार करायला देखील जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी एका सरणावर आठ जणांचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ बीड जिल्ह्यावर आली आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयात सात आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत मंगळवारी एकाच सरणावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार असाच सुरू राहिल्यास अजून भयंकर परिस्थितीला समोरो जावे लागेल.