उत्तरप्रदेश : संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात मोठया संख्याने आणि झपाट्याने रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्या बरोबर ऑक्सिजनची मागणी सुद्धा मोठया प्रमाणात देशभरात वाढलेली आहे. मात्र त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेगळाच फतवा काढला आहे. त्यांच्या या विधानावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
ते म्हणाले की, देशभरात ऑक्सिजनची कमतरता असली तरी उत्तर प्रदेशमध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. जे कोणी ऑक्सिजन नाही म्हणून सोशल मीडियावर मॅसेज फिरवतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जन दमच योगी आदित्यनाथ यांनी नेटकऱ्यांना दिला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीला अनेक कारणांमुळे उत्तर प्रदेशात कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे योगी यांचा दावा खरा की खोटा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच योगी आदित्यनाथ यांनी आईआईटी कानपुर, आईआईटी लखनऊ यांच्या साहाय्याने सरकारी ऑडिट करणार आहे. तसेच प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजनची गरज नसते असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे,