सोलापूर दि.१२ – कोरोनाच्या नावाखाली पोलीस प्रशासनाकडून कापड व्यापाऱ्यांची होत असलेले पिळवणूक थांबवण्यासाठी आज पंच रूढ कापड व्यापारी संघटनेच्या वतीने सोलापुरातील कापड व्यवसायिकांनी बंद पाळून या कारवाईचा निषेध नोंदवला आहे.
सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून टिळक चौकातील चाटी गल्ली प्रसिद्ध आहे. या कापड व्यापार मार्केटमधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. सध्या वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन राज्य शासनाने नियम कडक केले आहेत. या नियमाचे पालन करून कापड व्यापारी आपला व्यवसाय करत आहेत.
मात्र, पोलीस नाहक नियम दाखवत त्रास देण्याच्या भूमिकेतून कापड व्यापाऱ्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप करत कापड व्यापारी संघाच्या पदाधिकार्यांनी आज कापड मार्केट बंद केले आहे.