राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व वयोगातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी सिरम संस्थेने जाहीर केलेल्या लसीच्या दारावरून नवा वाद निर्माण झाला होता. त्यातच केद्र सरकारने सुद्धा सिरमला पत्र लिहून लसीचे दर कमी करण्याची विनंती केली होती. मात्र आता सीरमने आपल्या लसीचे दर कमी केले आहे. या संदर्भातील माहिती अदार पुनावाला यांनी दिलेली आहे.
कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी 100 रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली. त्यामुळे लसीचे दर कमी केल्यामुळे हा राज्य सरकार आणि केद्र सरकार या दोघांसाठी मोठा दिलासा आहे, या संदर्भात ट्विट करून सिरमकडून महिती देण्यात आलेली आहे.
आदर पुनावाला यांनी ट्विट करत कोविशील्ड लसीच्या किमती कमी करत आहोत. राज्य सरकारासाठी कोविशील्डच्या एका लसीच्या डोसची किंमत 400 वरुन 300 रुपये करत आहोत, अशी घोषणा आदर पुनावालांनी दिली. लसीच्या कमी केलेल्या किमती तात्काळ लागू होतील. कोविशील्डच्या लसीची किंमत कमी केल्यानं देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल, असं पुनावाला म्हणाले.