ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका रॅलीत जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना छळण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा हल्लाबोल ममत बॅनर्जी यांनी केला.
भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय. निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचतोय. माझे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना हटवण्यात आले. नंदीग्राम येथील घटनेला भाजप जबाबदार आहे, असा आरोप करत, भाजपविरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
पैसे देऊन लोकांना सभेला आणले जाते. भाजपच्या रॅलीत कोणीही जायला तयार नाही. यामुळे अमित शहांचा तिळपापड होतोय. म्हणूनच भाजपकडून पैसे देऊन लोकांना सभेला आणले जात आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बंगाल निवडणुकांपेक्षा देशाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे, असा टोला लगावला.