बुलडाणा – विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे उन्हाचे चटके अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. यामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलडाणा शहरातही सूर्य तळपायला सुरुवात झाल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे.
अचानक तापमान वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पारा ४१ अंश से. इतका वर गेला आहे.तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे उन्हाचे चटके अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. विदर्भात अचानक तापमान वाढण्यामागे राजस्थानकडून येणारे उष्ण वारे कारणीभूत असल्याची माहिती असून पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.