मुंबई : राज्यात विशेष करून मुंबईत कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्य स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर वयस्कर आणि अंध व्यक्तींना घरी जाऊन लस देण्याचा मनपाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आहे.
घरोघरी अर्थात डोअर टू डोअर जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राचे कोणतही धोरण नसल्याचं सांगण्यात आल्याचे मुंबई मिररने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र एकीकडे हे उत्तर दिलेलं असतानाच दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बूथ पद्धतीने करोना लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाण्यासंदर्भात माहिती दिली.
लोकांना दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये म्हणून ही मोहीम राबवली जाण्यासंदर्भातील भाष्य आरोग्यमंत्र्यांनी केले होते. अतिरिक्त सचिव (आरोग्य) सुरेश काकानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईमध्ये जवळजवळ दीड लाख असे लोकं आहे जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा अपंग असल्याने ते लस घेण्यासाठी केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही.
या लोकांना लस देता यावी यासाठी आम्ही याचसंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती.मात्र केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची असे कोणतही धोरण नाही असे मुंबई मनपा अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जर ही परवानगी मिळाली असती तर या लोकांना नक्कीच फायदा झाला असता.” असे ही त्यांनी बोलून दाखविले होते,