नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यातच एका दिवसात २,९५,००० हजार इतके रुग्ण आढळून आल्यामुळे देशाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. त्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे, याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत कोरोना लसीकरणाच्या मुद्दयावरून टीका केली आहे.
केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही… शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार” असं म्हणत राहुल यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. “केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी आहे असं देखील राहून गांधी यांनी बोलून दाखविले आहे.
केंद्र सरकार की वैक्सीन रणनीति नोटबंदी से कम नहीं-
* आम जन लाइनों में लगेंगे
* धन, स्वास्थ्य व जान का नुक़सान झेलेंगे
* और अंत में सिर्फ़ कुछ उद्योगपतियों का फ़ायदा होगा।— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 21, 2021