दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
सोशल डिस्टनसींगचे पालन न करणे तसेच विनामस्क घराबाहेर पडणे या नागरिकांच्या बेजावाबदरपणामुळे कोरोनाचा धोका कमी न होता वाढतच जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जात असल्याने लोकडॉऊन करण्यात येत आहे.
त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार की नाही यावरून सामन्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची तयारी करा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोवीस तासात राज्यात ४० हाजारांच्या वर कोविड रुग्णांचा आकडा वाढला असून राज्यात एकूण ३ लाख २५ हजारांच्या वर कोरोनाबधित रुग्ण आहेत. तर २२लाख ३२ हजार रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान रिकव्हरीचे प्रमाण घटत असून ८५.९५% इतके असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.