मुंबई दि. ३ – अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरु झालं आहे. आज विधिमंडळाचं ३ रा दिवस आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. सुधीर मुनगंटीवार जेव्हा भाषण करतात, तेव्हा मी नटसम्राट बघतोय की काय असा भास होतो. कुणी किंमत देता का किंमत, असा त्यांचा अभिनिवेश असतो, असा टोचक भाषेत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावलाय.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयावर भाष्य केले.’आम्ही भरलेली थाळी देतोय रिकामी थाळी वाजवत नाही बसलो’ अशा शब्दात त्यांनी विरोधीपक्षाला जोरदार टोला लगावलाय.
“आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावं? काय करू नये, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला. आज जी परिस्थिती तयार झाली आहे, करोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय? अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाउन करायचा की नाही. मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करू नका. कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन… पुन्हा येईन. काळजी घ्या. दुर्दैवानं थोडसं इकडेतिकडे झालं आणि व्हायरस पुन्हा परत आला,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.