कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असुन कोविड बाधित आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर आता परिस्थिती अजून हाताबाहेर जाऊ नये यासाठी १४एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत.
मागील वर्षीच्या लॉकडाउनची घोषणा अचानक झाल्याने सामान्य माणसांची तारांबळ उडाली होती. मात्र कोरोनाचे संक्रमण अधिक होत असल्याने मुख्यमंत्री पुन्हा लॉकडाउन करणार व किती दिवसांचे लॉकडाउन करणार याकडे आता संपुर्ण जनतेचं लक्ष लागून राहिले आहे.
तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना जनतेने लॉकडाऊन बाबत मानसिक तयारी करावी असे सांगितले आहे.
तसेच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंल्टिलेटर ,लसीकरण आणि जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारण्यासाठी आरोग्य यंत्रणा चोवीस तास तत्पर असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे