सध्याच्या परिस्थितीमुळे प्रत्येक गोष्टीवर निर्बध लागू करण्यात आले आहेत. अशातच लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन केल्याने लग्नात धाड टाकून वऱ्हाडींची वरात काढण्यात आली आहे.
त्रिपुरातील आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी लग्नात घुसून वऱ्हाडींवर कारवाई केली होती.
परंतु कारवाई दरम्यान वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या हस्तक्षेपाने यादवांवर कारवाई करण्यात आली.
एकीकडे अनेक कोरोनाने ग्रस्त झालेले रुग्ण आयसीयूत दाखल आहेत, तर दुसरीकडे काही मंगल कार्यालय चालक जिल्हा प्रशासनाचे नियम लाथाळून आपल्या मर्जीने लग्न समारंभ करत असल्याचं जिल्हाधिकारी यादव यांच्या निर्देशनास आले आहे.
त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं. मात्र, पोलीसही टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरं देत होते. त्यामुळे या लग्न सोहळ्यांना पोलिसांचंही हात असल्याचं त्यांच्या लक्षात आले.
कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे हे सर्व पाहून संतापलेल्या जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी स्वतः मंगल कार्यालयात जाऊन कारवाईला सुरुवात केली. मास्क न घातलेल्या वऱ्हाडींना चोपण्याचा आदेश देण्यात आला, तर नियम तोडूनही आम्ही काहीच चुकीचं केलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट अटक करण्यात आली.