देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, कोरोनाची दुसरी लाट आल्याने संक्रमण हे जलद गतीने होत आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी लॉकडाऊन लागेल का यावर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूचक संकेत दिले आहेत.
निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही आहे. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही.
तर कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही.
महाराष्ट्रात व अन्य ठिकाणी कडक निर्बंध करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध केले आहेत जेणेकरून आपण कोरोना विषाणूला रोखू शकतो मात्र पूर्णपणे देश बंद होणार नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.