देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्र सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहे. त्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर सुद्धा ताण पडला आहे. त्यात मध्यप्रदेशमध्ये घडलेल्या घटनेवरून आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशच्या आरोग्यमंत्र्य़ांच्या मतदारसंघामध्ये आरोग्य व्यवस्थेची बिकट परिस्थिती झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रायसेन जिल्ह्यातील सांचीमधील एका सरकारी रुग्णालयात माळी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर कोरोना चाचणी घेण्याचे काम सोपवण्यात आले आहे. रुग्णालयातील इतर सर्व स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने त्याला हे काम सोपवल्याची माहिती मिळत आहे. माळी कोरोना चाचण्या घेत असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी राजश्री तिडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीला चाचणी कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. आम्ही सध्या हतबल आहे, कारण इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच हे माळी देखील चाचणी घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.
एमपी अजब है ये स्वास्थ्य मंत्री @DrPRChoudhary के क्षेत्र साँची का अस्पताल है और #Corona के सैम्पल लेने का काम अस्पताल के माली हल्के राम सम्भाले हुये हैं, और मंत्री जी उधर दमोह में प्रचार कर रहे हैं @ABPNews @Deepak_Scribe @VishvasSarang @SanjayBragta @awasthis @upmita pic.twitter.com/ZGzkbnI9B1
— Brajesh Rajput (@brajeshabpnews) April 13, 2021