वॉशिंग्टन- न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुमो यांचं भान सुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधीच त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी वाढत्या चालल्या असून अजून एक अडचणीची भर पडली आहे. त्यांच्यावर आता आणखी एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. राज्यपालांनी मला पकडले आणि जोरात किस घेतले, असा महिलेचा दावा आहे. ही घटना महिलेच्या घरात तिच्या कुटुंबीयांसमोर घडली.
शेरी व्हिल यांनी सांगितले राज्यपाल अँड्र्यू कुमो पुरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माझ्या घरी आले.पण अचानक त्यांनी मला किस करायला सुरुवात केली. हे सर्व माझ्या कुटुंबासमोर घडले. मी लज्जित झाले होते आणि त्यांचे हे चुंबन घेणे विचित्र वाटले. पण त्यावेळी मी काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते.घटना मे 2017 मधील आहे. विलच्या मुलीनेही या किसचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अँड्र्यू कुओमोवर अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. गंभीर आरोप असूनही अध्यक्ष जो बिडेन यांनी अँड्र्यू कुमो यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने थांबावे असे त्यांनी म्हटले आहे.